महाराष्ट्राचे उद्योजक या मालिकेतून मी महाराष्ट्रातील अशा दिग्गज उद्योजकांबद्दल लिहिणार आहे ज्यांनी आजपर्यंत प्रचंड मोठे योगदान दिले आहे. या लेखमालिकेचे दोन उद्दिष्ट आहेत - एक, या दूरदर्शी उद्योजकांच्या कार्याचे योग्य कौतुक व्हावे; आणि दुसरे, नवीन पिढीला त्यांच्या यशोगाथेतून प्रेरणा मिळावी.
“मराठी माणूस धंदा करू शकत नाही”, “मराठी लोक उद्योग करण्यात मागे आहेत” - असे गैरसमज समाजात पुन्हा पुन्हा पसरवले जातात. या चुकीच्या समजुतीमुळेच अनेक महान मराठी उद्योजकांची कामगिरी योग्य प्रकाशात येत नाही. खरं तर, महाराष्ट्रातील उद्योजकांनी भारताच्या औद्योगिक जगताचाच पाया भरला आहे, आणि त्यांच्या या योगदानाची ओळख पटवून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठीच हा माझा छोटा प्रयत्न .
14 May 20206